Fetching Data .

Loading verse structure and chapter context.

GyanDweepBeta
HomeLearnLibrary
eGurukulsDiscoverTemplesPanchanga
Sign Up
Sign Up

sahasranAma

karuṇāṣṭake

करुणाष्टके

Verse

अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥

Verse

अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥

Verse

१ ॥

Verse

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥

Verse

रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥

Verse

२ ॥

Verse

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥

Verse

रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥

Verse

३ ॥

Verse

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥

Verse

प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचल भजनलीला लागली आस तूझी ॥

Verse

४ ॥

Verse

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥

Verse

घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥

Verse

५ ॥

Verse

जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥

Verse

तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥

Verse

६ ॥

Verse

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥

Verse

झडकरि झड घालीं धांव पंचानना रे । तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥

Verse

७ ॥

Verse

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी । म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥

Verse

दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥

Verse

८ ॥

Verse

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे । पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥

Verse

जळधरकण आशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥

Verse

९ ॥

Verse

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया । विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥

Verse

सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं । वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥

Verse

१० ॥

Verse

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥

Verse

जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥

Verse

११ ॥

Verse

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे । जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥

Verse

विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥

Verse

१२ ॥

Verse

सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें । भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥

Verse

भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना । परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥

Verse

१३ ॥

Verse

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं । सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥

Verse

घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें । रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥

Verse

१४ ॥

Verse

जळचर जळवासी न्स्णती त्या जळासी । निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥

Verse

भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥

Verse

१५ ॥

Verse

असंख्यात ते भक्त होऊनि गेले । तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥

Verse

नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥

Verse

१६ ॥

Verse

बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरिकंदरी भेटी नाहीं जनासी ॥

Verse

स्थिती ऎकतां थोर विस्मीत झालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलॊं ॥

Verse

१७ ॥

Verse

सदा प्रेमराशी तयां भेटलासी । तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी ॥

Verse

अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥

Verse

१८ ॥

Verse

तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥

Verse

बहू धारणा थोर चकीत जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥

Verse

१९ ॥

Verse

बहुसाल देवालयें हाटकाचीं ॥

Verse

रसाळ कळा लाघवें नाटकाचीं ॥

Verse

पुजा देखितां जाड जीवीं गळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥

Verse

२० ॥

Verse

कितेकीं देह त्यागिले तूजलागीं । पुढे जाहले संगतीचे विभागी ॥

Verse

देहेदु:ख होतांचि वेगीं पळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥

Verse

२१ ॥

Verse

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती ॥

Verse

पस्तावलों कावलों तप्त जालॊं । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥

Verse

२२ ॥

Verse

सदा सर्वदा राम सोडूनि कामीं । समर्था तुझे दास आम्ही निकामी ॥

Verse

बहू स्वार्थबुद्धीनें रे कष्टवीलों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥

Verse

२३ ॥

Verse

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही । नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं ॥

Verse

असा दीन अज्ञान मी दास तूझा । समर्था जनीं घेतला भार माझा ॥

Verse

२४ ॥

Verse

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी ॥

Verse

सदा प्रीती लागो तुझे गूण गातां । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥

Verse

२५ ॥

Verse

सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा ॥

Verse

उपेक्षूं नको गूणवंता अनंता । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥

Verse

२६ ॥

Verse

नको द्रव्य- दारा नको येरझारा । नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ॥

Verse

सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥

Verse

२७ ॥

Verse

मनीं कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावीं ॥

Verse

नको संशयो तोडिं संसारव्यथा । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥

Verse

२८ ॥

Verse

समर्थापुढें काय मागों कळेना । दुराशा मनीं बैसली हे ढळेना ॥

Verse

तुटो संशयो नीरसी सर्व चिंता । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥

Verse

२९ ॥

Verse

ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे । सुटे ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥

Verse

३० ॥

Verse

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं ॥

Verse

स्वहीत माझें होतां दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥

Verse

३१ ॥

Verse

विषया जनानें मज लाजवीलें । प्रपंचसंगे आयुष्य गेलें ॥

Verse

समयीं बहू क्रोध शांती घडेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥

Verse

३२ ॥

Verse

संसारसंगे बहु पीडलों रे । कारुण्यसिंधू मज सोडवीं रे ॥

Verse

कृपाकटाक्षें सांभाळि दीना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥

Verse

३३ ॥

Verse

आम्हां अनाथांसि तूं एक दाता । संसारचिंता चुकवीं समर्था ॥

Verse

दासा मनीं आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥

Verse

३४ ॥

śrī rādhikā sahastranāmastotram
śrīmanāce śloka

सा विद्या या विमुक्तये

Built with Sankalpa at Gyaandweep

Gyaandweep

© 2022-2026 Granthajyoti Pvt Ltd.

Privacy & Terms