Fetching Data .

Loading verse structure and chapter context.

GyanDweepBeta
HomeLearnLibrary
eGurukulsDiscoverTemplesPanchanga
Sign Up
Sign Up

sahasranAma

॥ pasāyadāna ॥

॥ पसायदान ॥

Verse

आता विश्‍वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥

Verse

१ ॥

Verse

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥

Verse

२ ॥

Verse

दुरितांचे तिमिर जावो । विश्‍वस्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणीजात ॥

Verse

३ ॥

Verse

वर्षत सकळमंगळी । ईश्‍वर निळांची मांदी याळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

Verse

४ ॥

Verse

चला कल्पतरूंचे आरव । चेताना चिंतामणीचे गांव । बोलते जे अर्णव । पीयुषाचे ॥

Verse

५ ॥

Verse

चंद्रमे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ॥

Verse

ते सर्वांहि सदा सज्जन । सोयरे होतु ॥

Verse

६ ॥

Verse

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिंही लोकीं । भजि जो आदि पुरुखीं । अखंडीत ॥

Verse

७ ॥

Verse

आणि ग्रंथोपजीविये । व विशेषीं लोकीं इये । दृष्टादृष्टविजयें । होआवे जी ॥

Verse

८ ॥

Verse

येथा म्हणे विश्‍वेधरावो । हा होईल दानपसवो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

Verse

९ ॥

śrīgaṇeśabhujaṃgastotram

सा विद्या या विमुक्तये

Built with Sankalpa at Gyaandweep

Gyaandweep

© 2022-2026 Granthajyoti Pvt Ltd.

Privacy & Terms